चंगळसाठी अल्पवयीन आरोपींनी विद्यार्थ्याचा मोबाईल लांबवला

0
भुसावळातील घटना ; दोघे संशयीत पोलिसांच्या ताब्यात
भुसावळ:- चंगळ भागवण्यासाठी दोघा अल्पवयीन विद्यार्थ्यांनी शाळकरी विद्यार्थ्यालाच मारहाण करीत त्याचा मोबाईल हिसकावून पळ काढला. ही घटना शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजता आरपीडी रोडवरील लोकागेटजवळ घडली. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी कंडारी येथील दोघा संशयीताना ताब्यात घेत असून त्यांची चौकशी केली जात आहे.
कंडारी येथील सतीश लक्ष्मण तायडे (वय 16) हा विद्यार्थी शनिवारी रात्री 9.15 वाजता त्याच्या घरी जात असतांना लोको गेटजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मारहाण करीत मोबाईल हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हवालदार संजय पाटील व त्याच्या सहकार्‍यांनी दोन्ही संशयीतांची माहिती काढत थेट कंडारी गाठून दुचाकीच्या क्रमांकावरून संशयीताचे घर गाठत त्यांना चौकशीकामी ताब्यात घेतले. तपास प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले व सहकारी करीत आहेत. दरम्यान, प्रथमच संशयीतांनी गुन्हा केल्याचे सूत्रांनी सांगितले.