चंदनसाठ्यासह संशयीत आरोपींना पंढरपूर तालुक्यातील आढीव मधून अटक

0

कोल्हापूर – येथील वनविभागाच्या रोपवाटिकेतील जवळपास एक कोटी रूपये चंदन चोरी प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील आढीव परिसरात रात्री कोल्हापूर पोलिसांनी दोन ते तीन जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमीक माहिती मिळतेय.

सन 2011-12 मध्ये अवैध वाहतूक तपासणीदरम्यान कोल्हापूर मध्ये पोलिसांनी 70 ते 80 लाखाची चंदनचोरी उघडकीस आणली होती. हे सर्व चोरीचे चंदन कोर्टाचे आदेशानुसार कोल्हापूर वनविभागाच्या रोपवाटीकेत बरेच वर्षापासून ठेवलेले होते. ते चंदन गेल्या मंगळवारी चोरीस गेले होते. याचा तपास पोलीस घेत असताना एलसीबी पथकाला पंढरपूर तालुक्यातील आढीव गावात हा चंदनसाठा असल्याचा सुगावा लागला. व एलसीबी पथकाने काल रात्री दीड वाजणेच्या दरम्यान येथे छापा टाकून चंदनसाठा व काही संशयीत आरोपींना ताब्यात घेतल्याची प्राथमीक माहिती समजते.

या चंदनचोरीतला मुख्य आरोपी मात्र अद्याप फरार असल्याचे समजते. मात्र पोलिसांकडून अद्याप तरी याबाबत कसलीही माहिती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आलेली नाही.