सांगली । पोलीस अधीक्षक कार्यालयातील मागील वर्षी झालेल्या चंदन चोरीप्रकरणी मोहोळ येथून समाधान चवरे याला पोलिसांनी अटक केली आहे. चंदन चोरीच्या तपासामध्ये चौकशी सुरू असताना गाड्या चोरल्याचे पोलीस तपासात समोर आले. तो आपल्या साथीदारांच्या सोबतीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून वाहन चोरी करत असल्याचेही उघडकीस आले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून चवरे याची सखोल चौकशी केली असता संजय नगर, कोल्हापूरच्या शिरोळ आणि सोलापूर जिल्ह्यातून एक डंम्पर, एक ट्रक आणि चारचाकी वाहन चोरल्याची कबुली त्याने दिली आहे. यानंतर पोलिसांनी ही वाहने जप्त करत गाडी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.