चंदीगड पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आरोप, गुन्हा दाखल

0

चंदीगड : चंदीगडच्या एका पोलीस उपनिरीक्षकावर मुंबईच्या एका मॉडेलने बलात्काराचा आरोप केला आहे. पीडितेने (वय-२५) चंदीगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

माहिती देताना पीडितेने सांगितले, की जून २०१८ मध्ये नवीन फोगाट नावाच्या पोलीस उपनिरीक्षकाने तिच्यावर बलात्कार केला. त्याने या घटनेचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला आणि फोटोही काढली. माहितीनुसार कोणीतरी फसवेगिरी करत फोगटच्या खात्यातून १२ लाख रुपयांचे कर्ज उचलले होते. त्यामुळे फोगट हा पीडितेला धमकी देऊन तिच्याकडे पैशांची मागणी करत होता.

सध्या पोलिसांनी कलम ३७६ (बलात्कार) आणि कलम ५०६ नुसार फोगाटवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिटकॉईन घोटाळाप्रकरणी आरोपी फोगाटने १५-२० लाख रुपयांची लाच घेतली होती. त्यामुळे त्याला ऑगस्ट-२०१८ मध्ये निलंबितही करण्यात आले.