साक्री । भारतीय जवान चंदू चव्हाण यांचा साक्री येथे साक्री तालुका प्रेस क्लब व अखिल भारतीय पत्रकार संघातर्फे राजे लॉन्स येथे सत्कार आयोजित करण्यात आला.
या सत्काराप्रसंगी त्यांचे आजोबा, भाऊ, धुळे उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश सोनवणे, साक्री ग्रा.पं.चे मुख्याधिकारी डॉ.मयुर पाटील, पीआय अभिषेक पाटील, एपीआय अतुल तांबे, साक्री तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, उपाध्यक्ष जगदीश शिंदे, पत्रकार संघाचे विशाल ठाकुर, जी.टी.मोहिते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विशाल देसले, डॉ.नितीन सोनवणे, माजी प्राचार्य एस.एन.खैरनार व मान्यवर उपस्थित होते.