कानळदा । अडावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका चंद्रकला अविनाश चव्हाण यांना सन 2017 चा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार जाहिर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दिल्लीत 12 मे 2017 रोजी राष्ट्रपती भवनात होणार असून पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. चंद्रकला चव्हाण हया कानळदा येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक यशवंत चव्हाण यांच्या सुनबाई असून आरोग्य सेवक अविनाश चव्हाण यांच्या पत्नी आहेत. चंद्रकला चव्हाण यांनी यापूर्वी वडाळी भोई, हातेड, रिंगणगाव चांदसणी येथे उत्कृष्ट कार्य केले आहे. सद्या त्या अडावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ओ.पी.डी. आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे.
कुटुंब कल्याण शस्त्रक्रीयांचे उल्लेखनीय कार्य
श्रीमती चव्हाण ह्या सन 2002 ते 2004 या वर्षात कुटूंब कल्याण कार्यक्रमात उत्कृष्ट काम करुन जिल्हात सर्वात जास्त प्रसुती केल्याबद्दल त्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे. तर 2013-14 मध्ये सर्वात जास्त कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याबद्दल पंचायत समितीमार्फत त्यांना प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कमळगाव उपकेंद्रात त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटविला आहे. चंद्रकला चव्हाण यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार मिळाल्याने कानळदा गावात आनंद व्यक्त केला जात असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉ. बी.आर.पाटील, डॉ.दीपक पाटोडे, डॉ.किरण पाटील, डॉ.मावळे, डॉ.निलिमा देशमुख, डॉ. सचिन ठाकुर, डॉ.बिराजदार, डॉ.निळे, डॉ.राष्ट्रपाल, डॉ. चौधरी, डॉ.किरण गोसावी, वसंत बैसाणे यांनी अभिनंदन केले आहे.