साकळी । दलित उत्थानासाठी कार्य करणार्या भारतीय दलित अकादमी दिल्लीच्या वतीने शोध पत्रकारितेत भरीव कार्य केल्याबद्दल चंद्रकांत नेवे तसेच होमगार्ड दलात अखंड सेवा, पत्रकारितेतील गाढा अनुभव तसेच सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील हिरीरीने भाग घेणारे सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत लिपिक बाळकृष्ण तेली या दोघांना यंदाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप जाहिर झालेले आहे. 9 डिसेंबर रोजी दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.