चंद्रकांत पाटीलांमुळे माझा भाजप प्रवेश झाला नाही; नारायण राणेंचा धक्कादायक खुलासा

0

मुंबईः माजी मुख्यमंत्री राज्यसभेचे भाजप खासदार नारायण राणे हे सध्या आत्मचरित्र लिहित आहेत. त्यांच्या आत्मचरित्रात अनेक धक्कादायक खुलासा खोणार असल्याची चर्चा आहे. मला शिवसेनेत ठेवल्यास उद्धव ठाकरे यांनी पत्नीसह घर सोडण्याची धमकी दिली होती अशी धमकी दिली होती असा दावा राणेंनी आत्मचरित्रात केल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले होते. दरम्यान त्यांनी आता नवीन खुलासा केला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे माझा भाजप प्रवेश झाला नाही असे राणे यांनी आत्मचरित्रात नमूद केले आहे. यावरून आता पुन्हा नवीन राजकारण रंगण्याची स्थिती आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलीच्या लग्नात माझी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. त्यांनी मला भाजपा प्रवेशाचेआश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांनी मला वर्षावर भेटण्यासाठी बोलावले. त्याचदरम्यान माझी नितीन गडकरींशीही चर्चा झाली. मला पक्षात घेतल्यास पाठिंबा काढण्याची शिवसेनेने धमकी दिली. सेनेच्या धमक्यांमुळे भाजपा नेतृत्व अस्वस्थ होते. मुख्यमंत्री यांनी नारायण राणेंना योग्य सन्मान दिला जाईल. त्यांच्या राजकीय वजनानुसार मंत्रिपद द्यावे लागेल, असे म्हणाले होते. मात्र त्यानंतर नंबर दोनचे नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील चलबिचल झाले. माझा भाजपात प्रवेश झाल्यास चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याकडील मोठी खाती माझ्याकडे येईल असे त्यांना वाटत होते असे राणेंनी सांगितले होते.