चंद्रकांत पाटील अवैध धंदे करणारे मंत्री: राजू शेट्टी

0

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी कोल्हापुरातील हातकणंगलेमधून लोकसभा निवडणूक लढत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. दरम्यान राजू शेट्टी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. चंद्रकांत पाटील हे अवैध धंदे करणारे दोन नंबरचे मंत्री आहे असे आरोप खासदार शेट्टी यांनी केले आहे.

‘चंद्रकांत दादांनी बिंदू चौकात यावं आणि चर्चा करावी. मी कुठली सेटलमेंट केली हे सिद्ध करावं’ अशी टीक करत राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांना खुले आव्हान दिले आहे. ‘शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात’ असा गंभीर आरोप भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्या टीकेवरही राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटीलांना प्रत्त्युतर दिलं आहे. ‘चंद्रकांत दादांनी कुणाकडून किती घेतले हे मी सिद्ध करतो’