मुंबई: काल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ९५० कोटींचा भ्रष्ट्राचार व भूखंड घोटाळ्याचे आरोप केले होते. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता आरोप करण्यात आल्याने जयंत पाटील यांचे भाषण सभागृहाच्या पटलावरून काढण्यात आले, दरम्यान याबाबत आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत याबाबत निवेदन करत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. महसूलमंत्र्यांच्या निवेदनावर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतल्याने सभागृहात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा गोंधळ झाला. यावरून सभागृहाचे कामकाज १५ मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.
मी पूर्वसूचना न देता आरोप केल्याने माझे भाषण पटलावरून काढण्यात आले, विषय पटलावर नसतांना चंद्रकांत पाटील यांनी कशा संदर्भात स्पष्टीकरण केले असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केले. जर चंद्रकात पाटील यांचे निवेदन पटलावर ठेवायचे असेल तर माझे कालचे भाषण देखील पटलावर घ्यावे अशी मागणी त्यांनी केली. सर्व विरोधकांनी ही मागणी लावून ठरत सभागृहात गोंधळ घातले.