नंदुरबार! तांत्रिक अडचणीमुळे नगरपालिकेच्या सभेचा व्हिडीओ रेकॉर्डिंग झाली नाही, असे पत्र मुख्याधिकार्यांनी दिले आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत पेश केलेला तो व्हिडीओ नगरपालिका सभेतील नव्हताच, तसे असेल तर तो सिद्ध करून दाखवा असे आव्हान भाजपचे डॉ. रवींद्र चौधरी यांनी दिले आहे.
नगरपालिकेची लाईन झालेली सभा चांगलीच गाजत असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत खोडलेल्या मुद्यांना भाजपने पुन्हा आव्हान दिले आहे. सत्ताधाऱ्यांनी एखाद्या तरी भाजप नगरसेवकाला अपात्र करून दाखवा, किंवा आम्ही दोन महिन्यातच नागराध्यक्षांना अपात्र करून दाखवू असे खुले आव्हान डॉ. रवींद्र चौधरी यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना दिले आहे.