यावल- तालुक्यातील वढोदा येथील चार बालकांनी चंद्रज्योती झाडाच्या बिया खाल्ल्याने त्याची प्रकृती बिघडली आहे. यातील एका बालकाची प्रकृती चिंताजनक असून चौघांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. वढोदा येथील कीर्ती गोपाल खंबायत (वय 9), मोहिनी पांडू भिल (10), अजय बापू सपकाळे (11) व शेखर किरण पाटील (9) अशी या बालकांची नावे आहेत. त्यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता वढोदा गावातच चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्या. त्यामुळे दुपारनंतर त्यांना उलटी व जुलाबाचा त्रास होऊ लागला. रात्री सात वाजता या चौघांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात अजय सपकाळे याची प्रकृती चिंताजनक असून चौघांवर उपचार सुरू आहेत.