चंद्रपूरमध्ये वाघाचा पुन्हा हल्ला; गुराखी ठार

0

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये वाघाने पुन्हा हल्ला केला असून या हल्ल्यात गुराखी ठार झाला आहे. दिवाकर गेडाम असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गेल्या चार दिवसात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे.

ब्रह्मपुरी वनविभागातील दक्षिण ब्रह्मपुरी वनपरीक्षेत्राअंतर्गत हडदा येथे शनिवारी सकाळी वाघाने गुराख्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गुराखी दिवाकर गेडाम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी चंद्रपूरमधील जंगलात चारा आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. राजू नागेश्वर गुजलवार (३५) असे या तरुणाचे नाव होते. लोहारा गावात राहणारा राजू हा चारा आणण्यासाठी जंगलात गेला होता.