चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेच्या मतदानाची वेळ वाढवली

0

मुंबई – चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी येत्या 19 एप्रिलला मतदान होणार असून तेथील मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या महापालिकांसाठी आता संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

शनिवारी रात्री उशिरा राज्य निवडणूक आयोगाने याबाबतची अधिसूचना जारी केली. येत्या २१ तारखेला येथे मतमोजणी होणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेची 29 एप्रिल 2017, लातूर महानगरपालिकेची 20 मे 2017 तर परभणी महानगरपालिकेची 15 मे 2017 रोजी मुदत संपत आहे.

निवडणुकांसंदर्भातील तपशील
महानगरपालिका लोकसंख्या मतदार एकूण जागा महिला राखीव सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग
चंद्रपूर 3,20,379 3,02,359 66 33 30 13 5 18
लातूर 3,82,940 2,78,374 70 35 38 12 1 19
परभणी 3,07,170 2,12,888 65 33 38 8 1 18
एकूण 10,10,489 7,93,621 201 101 106 33 7 55

धुळे, सांगलीला पोटनिवडणूक
सांगली- मीरज- कुपवाड महानरपालिकेतील प्रभाग क्र. 22 ब, जळगाव महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 24 अ आणि कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 46 च्या रिक्तपदासाठीही 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होईल.

जि.प. व पं. स. पोटनिवडणूक
धुळे जिल्हा परिषदेच्या शिरूड (ता. धुळे) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर (ता. तेल्हारा) निवडणूक विभागाच्या तर अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होणार आहे.