चंद्रभागेत जळगावचे चार युवक बुडाले; एकाचा मृत्यू तर तिघांना वाचविण्यात यश

0

पंढरपूर-पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत आंघोळीस उतरलेले जळगावचे चार युवक बुडाले. यातील तीन युवकांना वाचवण्यात यश आले पण एकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली. राहुल रवींद्र काथार असे मृत युवकाचे नाव आहे.

उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. जळगावहून आलेले नितीन दत्तू कुबर, राजेंद्र अशोक सोनार, भरत रवींद्र काथार आणि राहुल रवींद्र काथार हे चौघे युवक आंघोळीसाठी नदीत उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ लागले. त्यावेळी तिथे असलेल्या लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. यात तिघांना वाचवण्यात यश आले. पण राहुलचा बुडून मृत्यू झाला. राहुलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून तो शवविच्छेनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान गेल्या आठ दिवसात चंद्रभागा नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने आपात्कालीन यंत्रणा तैनात केले नसल्याचे सांगण्यात येते.