चंद्रशेखर आझाद 29 डिसेंबर ते 4 जानेवारी महाराष्ट्र दौर्‍यावर

0

मुंबई : भीम आर्मीचा संस्थापक अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद यांची तोफ लवकरच मुंबईत धडाडणार आहे. भाजपा हटाओ संविधान बचाव  असा नारा देत चंद्रशेखर आझादने देश पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून चंद्रशेखर आझाद महाराष्ट्र दौर्‍यावर येणार आहे. 29 डिसेंबर ते 4 जानेवारी असा हा दौरा असणार असून मुंबई, पुणे, लातूर आणि अमरावती इथे त्यांच्या जाहीर सभा होणार असल्याची माहिती भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी दिली आहे.

दीड-दोन महिन्यांपूर्वीच चंद्रशेखर आझाद यांची उत्तर प्रदेशातील तुरूंगामधून सुटका झाली आहे. योगी सरकारने त्यांच्यावर रासुका लावत त्यांना अटक केली होती. तब्बल 16 महिने ते तुरूंगात होते. तुरुंगातून सुटका झाल्याबरोबर त्यांनी भाजपा हटाव संविधान बचाव, देश बचाव हाच आपला नारा आणि पुढचे उद्दीष्ट असल्याचे जाहीर केले. गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी आणि चंद्रशेखर आझाद यांच्याकडे तरूण दलित नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. त्त्यातच भाजपाचे 3 राज्यात पानीपत झाल्यानंतर लागलीच भाजपा हटावचा नारा देत चंद्रशेखर आझाद मुंबईत तरूणांना संबोधित करणार असल्याने सभेकडे सर्वाचेच लक्ष असल्याचेही कांबळे म्हणाले.