नवी दिल्ली: आज लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान होत असून, येत्या २३ तारखेला त्याचा निकाल लागणार आहे. या दरम्यान देशातील विरोधी पक्ष पुन्हा एकत्र येताना दिसत आहे. सत्ता स्थापनेची संधी मिळाली तर यासाठी एकमेकांच्या गाठीभेटी घेणे सुरु आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गेल्या २४ तासात शरद पवार यांची दुसऱ्यादा भेट घेतली असून, या भेटीमागे नेमके काय आहे? याचा तर्कवितर्क राजकीय विश्लेषक लावत आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी राहुल गांधी, शरद पवार यांची भेट घेतली होती. नंतर बसपाच्या अध्यक्षा मायावती, सपा चे अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. पुन्हा आज त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादीचे नेते सिताराम येचुरी यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे.
देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस पंतप्रधान पदाचा त्याग करेल, असा दावा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला होता. येत्या २३ में रोजी सोनिया गांधी यांनी २१ पक्षांची बैठक बोलावली आहे, त्या बैठकीत काय होते याकडे सगळ्यां पक्षांचे लक्ष लागून आहे.