‘चंपा’ शब्द माझा नसून भाजपच्याच एका मंत्र्यांचा; अजित पवारांचा गौप्यस्फोट

0

पुणे : राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा खोचकपणे ‘चंपा’ असा उल्लेख करतात. मात्र याबाबत त्यांनी खुलासा केला आहे. मी वापरलेला ‘चंपा’ हा शब्द माझा नसून भाजपच्याच एका कॅबिनेट मंत्र्यांचा आहे असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. ती व्यक्ती कोण आहे ही मी चंद्रकांतदादांना भेटून सांगेन. मात्र आम्ही नाही तर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे मंत्री असे म्हणतात, हा आमचा शब्द नाही.

पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.