श्रीनगर । बांदिपोरा जिल्ह्यातील हजीन भागात भारतीय लष्कर व दहशतवाद्यांसोबत झडलेल्या जोरदार चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले; तर या कारवाईत तीन जवान शहीद झाले आहेत. एका नागरिकासह नऊ जवान जखमी झाले आहेत. श्रीनगरजवळ हजीन गावात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती अर्धसैनिक दलाला मिळाली होती.
आणखी एका सर्जिकल स्ट्राईकची गरज!
मोठ्या प्रमाणात शस्त्रसज्ज असलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले असता, त्यात तीन जवान शहीद झाले. गेल्या काही दिवसांपासून या भागात दहशतवादी कारवाया वाढल्या असून, दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी आणखी एक सर्जिकल स्ट्राईक राबविण्यात यावे, अशी अपेक्षा बीएसएफच्या जवानांनी व्यक्त केली आहे. ठार मारण्यात आलेला दहशतवादी हा लष्कर-ए-तोयबा संघटनेचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.