चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा

0

नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरच्या त्रालमध्ये अतिरेकी आणि सरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले. तर एक स्थानिक पोलिस दलाचा जवान शहीद झाला. चकमकीत लष्कराच्या एका मेजरसह चार जवान जखमी झाले असून त्यांना श्रीनगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अतिरेकी ज्या घरात लपले होते ते घर लष्कराने उध्वस्त केले.

लष्करावर दगडफेक
जेव्हा सुरक्षा दल लपून बसलेल्या अतिरेक्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत होते, त्यावेळी घटनास्थळी असलेल्या काही उपद्रवी स्थानिक नागरिकांनी लष्कराच्या जवानांवर दगडफेक केली. अतिरेक्यांशी चकमक सुरू असताना दगडफेक होण्याची ही पहिलीच घटना नसून यापुर्वीही अतिरेक्यांना मदत करण्याच्या उद्देशाने अशाप्रकारे दगडफेक करून मदत करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला आहे.

लष्करप्रमुखांच्या इशार्‍याकडे दुर्लक्ष
यापुर्वीच लष्करप्रमुखांनी अतिरेक्यांना मदत करणार्‍या नागरिकांना इशारा दिला होता. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी अशा इशारा देताना म्हटले होते की, कश्मिरात जे स्थानिक नागरिक अतिरेक्यांना साथ देत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यापुढे दगडफेक केलीत तर गोळ्या खाव्या लागतील. लष्कर प्रमुखांनी हा इशारा मागील महिन्यात हंदवाड्यातील चकमकीनंतर दिला होता. ज्यामध्ये 4 जवान शहीद झाले होते. त्यावेळीही अतिरेक्यांना वाचविण्यासाठी काही स्थानिकांनी दगडफेक केली होती.