श्रीनगर- जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला असून सुरक्षा दलांनी सोमवारी आणखी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. परिसरात सध्या शोधमोहीम राबवली जात आहे.
कुपवाडा सेक्टरमधील तंगधार येथे घुसखोरीचा डाव भारताच्या सतर्क जवानांनी उधळून लावला. पाकमधून भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले. रविवारपासून आत्तापर्यंत या भागात सैन्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या एकूण पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सोमवारी चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.