चक्कर येऊन प्रवाशी बसमध्येच दगावला

0

जळगाव। यावल-औरंगाबाद बसमधून जात असलेल्या गोंदेगावच्या तरूणाला स्वातंत्र्य चौकात अचानक चक्कर येवून छातीत दुखू लागल्याने त्याला खाजगी रूग्णालयात बसचालकाने उपचारार्थ दाखल केले. परंतू उपचार घेत असतांनाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकाश पद्माकर उदगीर (वय-36) असे मयत तरूणाचे नाव आहे.

बसमध्ये प्रवास करत असतांना आले चक्कर
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील रहिवासी असलेले प्रकाश पद्माकर उदगीर (वय 36) हे 25 रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकावर आल्यानंतर यावल-औरंगाबाद या बसमध्ये बसून त्यांच्या गावाकडे जात असतांना त्यांना स्वातंत्र्य चौकातच त्यांना अचानक चक्कर येवून छातीत दुखू लागले. यावेळी तात्काळ बसचालकाने बस आकाशवाणी चौकातील गणपती हॉस्पिटल येथे उभी करुन त्यांना उपचारार्थ दाखल केले. यावेळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत एस.टी. चालक रव्रिंद्र आधार सोनवणे यांचे खबरीवरुन जिल्हापेठ पोलिस स्थानकात प्रकाश पद्माकर उदगीर यांचे मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्या आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. चंद्रकांत पाटील हे करीत आहेत. या प्रकारामुळे बस बराच वेळ जळगाव शहरात थांबुन होती. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर रुग्णालयात सहप्रवाशी, वाहन, चालकासह नागरिकांची गर्दी होती.