चक्कर येवून खाली पडल्याने जखमी

0

जळगाव । सायकल वरुन मोहडीरोडकडे जात असतांना चक्कर येऊन खाली पडल्याने 52 वर्षीय व्यक्ति जखमी झाला असून उपचारार्थ जिल्हा समान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेली माहीती अशी की, बाबूलाल रामसुंदर भोळे (वय-52) रा. रायसोनी नगर, जळगाव हे माळीचे काम करतात, नेहमीप्रमाणे आज सकाळी 9 वाजता आजारी असतांना देखील मोहडी रोडवर एका बंगल्यावर कामासाठी सायकलवरुन निघाले. रस्त्याने जात असतांना त्यांना चक्कर आल्याने ते सायकलवरुन खाली पडले. यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रक्तबांभाळ झाले. नातेवाईक यांनी तात्काळ जिल्हा समान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र प्रकृती अधिक खलावल्याने गोदावरी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.