चक्कर येवून रेल्वेतून पडला तरूण

0

जळगाव। जळगाव रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास रेल्वेत चक्कर आल्याने दरवाजातून खाली पडला. त्यात तरूण गंभीर जखमी झाला आहे. भुसावळ-मुंबई पॅसेंजरने सोमवारी सकाळी मच्छींद्र राजाराम पवार (वय 30) हा भुसावळ येथून जळगावकडे येत होता.

जळगाव स्थानकावर उतरण्यासाठी तो दरवाजाजवळ येऊन उभा राहिला. त्यावेळी मच्छींद्र याला अचानक चक्कर आल्याने तोल जाऊन तो रल्वे खाली पडला. त्याला उपचारासाठी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.