VIDEO: चक्क एसपी ऑफिससमोरच महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

0

जळगाव : कौटुंबिक वादातून एका विवाहितेने गुरुवारी दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर एका झाडावर सोडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी फिरोज तडवी यांच्या वेळीच प्रकार लक्षात आल्याने त्यांनी तातडीने त्या महिलेला झाडावरून खाली उतरविल्याने दुर्घटना टळली. घटनास्थळी गेला पेठ पोलिस निरीक्षक अकबर पटेल स्थानिक गुन्हे शाखा कर्मचारी तसेच रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक याच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली महिलेला जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.

संबंधित विवाहिता ही जळगाव तालुक्यातील ममुराबाद जवळ असलेल्या एका गावातील आहे . पतीशी या महिलेचा वाद सुरू असून मुले ताब्यात देत नसल्याने तिने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे . यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने कंटाळून महिलेने सदरचा प्रकार केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे