चक्क नितीन गडकरींच्या मतदान यादीतील नावापुढे ‘रिजेक्टेड’चा शिक्का !

0

नागपूर: नागपुरात आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरु झाले आहे. दरम्यान चक्क उमेदवाराच्या मतदान यादीतील नावापुढेच ‘रिजेक्टेड’चा शिक्का मारल्याचा प्रकार दिसून आला. भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नावावर रिजेक्टेड असा शिक्का मारण्यात आला आहे. नागपुरातल्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेत हा प्रकार आज समोर आला.

मतदारांना उमेदवारांची माहिती मिळावी यासाठी उमेदवारीची यादी मतदान केंद्राबाहेर लावली जाते. न्यू इंग्लिश स्कूलच्या बाहेरही ही यादी लावण्यात आली. या यादीत गडकरींच्या नावापुढे रिजेक्टेडचा शिक्का मारण्यात आला. एकाच नाही अनेक याद्यांवर हे शिक्के होते. हे शिक्के कुणी मारले? का मारले हे अद्याप समजू शकलेले नाही.