न्यूयॉर्क । आपल्या श्रीमंतीची प्रदर्शन अरब देशांमधील रॉयल फॅमिली करतात हे नेहमीच बघायला मिळते. पण आता कतारमधील रॉयल फॅमिलीचा गजब कारनामा समोर आला आहे. न्युयॉर्कमध्ये तब्बल 41 मिलियन डॉलर म्हणजेच 265 कोटींचा बंगला या रॉयल फॅमिलीने खरेदी केला आहे. पण हा आलिशान बंगला त्यांनी स्वतःसाठी नाहीतर त्यांच्या नोकरांसाठी खरेदी केला आहे.
आधुनिक सुविधायुक्त
यामध्ये मोठ-मोठे डायनिंग हॉल, बार, क्लब, लाइब्रेरी, जिम, मसाज आणि प्लेरूम सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. या बंगल्याची किंमत 275 कोटी रुपये होती.
रॉयल फॅमिली मालक
याबाबतचे वृत्त डेलीमेलने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, न्यूयॉर्कमध्ये कतार येथील रॉयल फॅमिलीने त्यांची तिसरी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. हा बंगला रॉयल फॅमिलीने रियल स्टेट मर्चेंट बँक आईलँड कॅपिटल ग्रुपचे संस्थापक अरबपती एंड्रयूफार्क्ससे यांच्याकडून खरेदी केला आहे. 10 हजार 400 स्क्वेअर फूटाचा हा पाच मजली बंगला सर्व आधुनिक सोई सुविधांनी परिपूर्ण आहे.