चक्रधर स्वामींची शिकवण आचरणात आणल्यास जीवन आनंदमयी

0

आमदार हरीभाऊ जावळे ; श्री चक्रधरस्वामी अवतार दिनानिमित्ताने धर्मसभा

यावल- मनुष्य जन्मास आल्यानंतर कसे आचरण ठेवावे या संदर्भात श्री चक्रधर स्वामींनी दिलेल्या शिकवणुकीप्रमाणे मनुष्याने त्यांची शिकवण आचरणात आणली तर निश्‍चितच मनुष्याचे जीवन आनंदमयी होते. धर्मपरीषदेच्या निमित्ताने असो अथवा कोणत्याही हिंदू धर्मातील मेळाव्यात असो त्या-त्या पंथाचे संत-महात्मे नेहमी माणसांना धर्मसंस्काराचा मार्ग दर्शवित असल्याने त्यांचे विचार मानवी जीवनास निश्‍चित वळण देत असतात, असे विचार आमदार हरीभाऊ जावळे यांनी येथे व्यक्त केले. महानुभाव पंथाचे श्री चक्रधरस्वामी अवतार दिनानिमित्ताने फैजपूर रोडवरील जुन्या ऑईल मिलमध्ये मंगळवारी धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. राज्यातून धर्मगुरूंनी येथे हजेरी लावली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी आचार्य साळकर बाबा होते. कार्याध्यक्ष राजधर बाबा मराठे होते. सभाध्यक्ष आचार्य साळकर बाबा म्हणाले की, श्री चक्रधर स्वामींनी विश्वबंधुत्व, स्त्रीमुक्ती, स्त्री शिक्षण यासाठी सुमारे 800 वर्षापूर्वीच क्रांती केली. त्यांनी संपुर्ण आयुष्य विश्वशांतीसाठी वेचले, असे सांगत प्रत्येकांनी स्वामींची शिकवणूक आचपणात आणावी, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, पहाटे श्रींचे मंगलस्नान करण्यात येवून श्रीमद् भगवतगीतेचे पारायण व धर्मध्वजारोहनानंतर धर्मसभा घेण्यात आली.

यांची धर्मपरीषदेस उपस्थिती
यावलच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी, बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, नगरसेवक राकेश कोलते, डॉ.कुंदन फेगडे, अतुल पाटील, पौर्णिमा फालक, देवयानी महाजन यांच्यासह विश्श्वनाथबाबा लासुरकर, महंत वाघोडेकर बाबा, कानेराज बाबा, निलेश बीडकर, कृष्णराज पाचराउत, आचार्य सुरेश मानेकरबाबा यांच्यासह राज्यभरातून संत, महंत, भिक्षुक, यांच्यासह पंथबंधू उपस्थित होते. सूत्रसंचालन मधुशास्त्री मराठे यांनी केले. यशस्वातेसाठी सचिन कासार, वासुदेव जावळे, राजु फालक, प्रशांत साळी, देवसिंग पाटील, योगेश बारी, वासुदेव महाजन, सुमित साळी, दीपक पाटील आदींनी परीश्रम घेतले.