नांद्रा । पाचोरा येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री चरणांकीत तीर्थस्थानाच्या श्री चक्रधर स्वामी मंदिराचा जिर्णोध्दार कळसारोहण उद्घाटन, भेटकाळपर्व, संन्यास दिक्षा अनुसरण विधा असा कार्यक्रम उद्यापासून तीन दिवस होत आहे. 22 ते 24 रोजी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 23 रोजी देशमुख वाडी येथुन मंदीरापर्यंत श्रीकृष्ण मुर्तीची शोभायात्रा दुपारी 4 वाजेपासून निघणार आहे. जामनेर रोड पाचोरा येथील पेट्रोल पंपा शेजारी हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास प.पु.प.म. येळमकर बाबा आंबेवडगाव, प.पु.प.म.वैराग्यमुर्ती मोठे बाबा जाधववाडी, प.पु.प.म.दुतोंडे बाबा महानुभाव कुसंदा, प.पु.प.म.वर्धनस्थ बीडकर बाबा महानुभाव रणाईचे, प.पु.प.म.श्री मोठे बाबा खामनीकर जाळीचादेव, प.पु.प.म.महर्शी विद्याधर दादा पंजाबी टाकळी यांच्यासह महानुभाव पंथातील जेष्ठ श्रेष्ठ मान्यवर आचार्य विनीत केलेले आहेत तरी कार्यक्रमाचा लाभ द्यावा असे आवाहन सहयोजक मुरलीधर महानुभाव अर्थात मानेकर बाबा श्री क्षेत्र कनाशी यांनी केलेले आहे.