पुणे । ‘नवचैतन्य हास्ययोग परिवार’तर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी चतुशृंगी मंदिरात 5 हजारहून अधिक पणत्यांचा दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता! चंद्रोदयाच्या साक्षीने हजारो पणत्या उजळल्याचे दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले. शुक्रवारी (दि.3) सायंकाळी 6 वाजता हा दीपोत्सव झाला.यावेळी विजय भोसले यांनी केलेले दीपोत्सवासाठी भव्य आकाराचे रेखांकन व प्रसिद्ध रांगोळी कलाकार रामदास चौंडे यांची रांगोळी हेही या दीपोत्सवाचे आकर्षण होते. चतुश्रुंगी देवीच्या दर्शनासाठी आणि देवीसमोर पणती लावण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली.
श्री स्वामी समर्थ व्यापारी मंडळ
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती विविधतेने नटलेली आहे. सण असो वा उत्सव खाद्यसंस्कृतीला बहर येतो. कोकण, प.महाराष्ट, मराठवाडा आदी विभागांत पक्वान्नांच्या वेगवेगळ्या तर्हा आढळतात आणि हे सारे संचित पहावयाचे असेल तर महात्मा फुले मंडईतील श्री स्वामी समर्थ व्यापारी मंडळाने श्री स्वामी समर्थांच्या नूतन मंदिरापुढे आयोजित केलेल्या अन्नकोट प्रदर्शनात ठेवण्यात आले होते.
सातशे प्रकारचे पदार्थ मांडले
त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या अन्नकोटमध्ये सातशे प्रकारचे पदार्थ मांडले आहेत. महाराष्ट्राचे जणू खाद्यसंमेलन भरले आहे. शुक्रवारी दिवसभर अन्नकोट ठेवला होता. व्यापारी मंडळाचे प्रमुख विश्वस्त राजाभाऊ कासुर्डे आणि त्यांच्या सहकार्यांनी मांडलेल्या अन्नकोट प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.