चप्पलमार खासदाराचे दिल्ली पुणे तिकीट रद्द

0

नवी दिल्ली । इंडियानेही चांगलाच धडा शिकवलाय. त्यांचे आजचे नवी दिल्ली ते पुणे हे तिकीटच रद्द करण्यात आले. एअर इंडियाच्या संघटनेने लोकसभा अध्यक्षांना पत्रही लिहिलंय. खासदाराने आमची माफी मागावी, असे त्या पत्रात लिहिलंय, तर दुसरीकडे गायकवाड यांनी हवाई वाहतूक मंत्री यांना पत्र लिहून एअर इंडियाच्या कर्मचार्‍याविरोधात तक्रार केली. माझ्यासोबत उद्धटपणे वागल्याचे त्यांनी म्हटले. रवींद्र गायकवाड यांनी त्यांचं स्पष्टीकरण शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्याकडे दिले आहे.

काल शिवसेना पक्षाकडून खासदार रवींद्र गायकवाड यांना अधिकृत जाब विचारला होता. दरम्यान, गायकवाड यांची मुजोरी कायम आहे. मी माफी मागणार नाही, माफी त्यांनी मागावी, असे ते म्हणालेत. मी काहीही चूक केली नाही, दोष त्यांचा आहे. माझ्याबाबत उद्धव ठाकरे बोलतील, आमचे संसदेतले नेतेही बोलतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

एअर इंडियाने ब्लॅक लिस्ट केल्यानंतर आता फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सनेही शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हवाई प्रवासाला मनाई केली आहे. पण संध्याकाळी पुन्हा एअर इंडियाच्या विमानाने जाणार आहे, त्यांनी मला अडवून दाखवावं, असं आव्हान रवींद्र गायकवाड यांनी दिलं आहे.

खासदार रवींद्र गायकवाड यांनी दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या अधिकार्‍याला चपलेने मारहाण केली होती. त्यानंतर एअर इंडियाने रवींद्र गायकवाड यांना ब्लॅक लिस्ट केलं. फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्समध्ये जेट एअरवेज, इंडिगो, गो एअर, स्पाइसजेट यांचा समावेश आहे. त्यामुळे आता रवींद्र गायकवाड यांना या विमानातून प्रवास करता येणार नाही.