विरोधकांनी स्वतःचे कारनामे व समाजसेवी कामांची यादी जाहीर करण्याचे आव्हान
पाचोरा । जे लोक अतिक्रमण विषयांचे राजकारण करण्याचे प्रयत्न करत आहे व त्या व्यक्तीने उघड आयुष्यात कधीच समाजसेवा केली नाही? समाजसेवा काय असते हे सुध्दा कळलं नाही? ज्याने फक्त आयुष्यात फक्त काड्याकोरणे, भानगडी लावणे, रिकामे उद्योगाशिवाय दुसरे कामं केलं नाहीत, सतत चमकोगिरी करणार्या असे कनिष्ठ अपुर्ण विचारवंताने शिवसेनेला व पाचोरेकरांना ज्ञान शिकवु नये, सर्वांना कळतं कोण किती पाण्यात आहे. म्हणुन आमदार किशोर पाटील यांच्यावर पोकळ आरोप करणारे कनिष्ठ विचारवंताने हे समजुन घ्यावे कि, ज्यांनी स्वतःचे अंगातली रक्ताची अर्धी बाटली गरजू रूग्णांना दान केली नाही, त्यांनी शिवसेनेला ज्ञान शिकवु नये.
आमदार किशोर पाटील वर्षानुवर्षे समाजसेवा करत आले होते, करत आहे आणि भविष्यात पण समाजसेवा करत राहतील यात शंका नाही, असा टोला शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांनी विरोधकांना टोला दिला.
पाचोरा शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांचा टोला
‘अतिक्रमण हटाव’ हे जनहितासाठीच
शहरातील व तालुक्यातील जनतेच्या आकर्षणाची केंद्रबिंदु असलेली बाजारपेठ म्हणजे पाचोरा आहे. लहान, छोटे, मोठे व्यावसायिकांचे उपजिवेकेचे साधन आहे हि बाजारपेठ पण मागील काळात पाचोरा शहरातील रहदारीचा व वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता आणि त्याचे दुष्पपरीणाम वाईट ठरले आणि आपलेच दोन जीवाभावाचे लोकांना अपघातात जीव गमवावे लागला आणि त्यांचे कुटुंब उघड्यावर आले. या घटनेला ट्रकचालक हा दोषी जरी असला तरी त्याला कायद्याने योग्य शिक्षा मिळेल यात शंका नाही, पण त्याच बरोबर या सतत होत असलेले काही घटनांना वाहतुक अधिकारी व अतिक्रमण पण जबाबदार होतं हे पण तेवढेचं महत्वाचे भाग आहे.
मग अशा परीस्थितीत सर्व पाचोरा शहर, तालुका, समाजसेवा, राजकिय, प्रसारमाध्यमाकडुन अतिक्रमण या विषयावर आवाज उचलला गेला आणि पाचोरा आमदार याकडे लक्ष देत नाही? दुर्लक्ष करतात? अजुन किती बळी अपघातात जातील? यासारखे संवेदनशिल असे अनेक प्रश्न विचारले गेले. म्हणुन आमदार किशोर पाटील यांनी तालुक्यातील ४ लाख जनतेची मागणीकडे व त्यांचे हित समोर ठेवुन संबंधित अधिकारी यांना जे रस्त्यालगतचे सर्व अतिक्रमण कोणतेही भेदभाव न ठेवता सरसकट तात्काळ काढण्याची सुचना जनतेच्या मागणीमुळे व आक्रोशामूळे केली.
या अतिक्रमण काढतांना अधिकार्यांकडून जर कुठे भेदभाव व काही दबाव तंत्रमुळे, इतर कोणतेही कारणांमुळे अतिक्रमण राहिले असेल? तर त्याचे आढावा घेऊन लवकरचं ते पण काढण्याची सुचना अधिकारी यांना करण्यात येईल व सर्वांना समान न्याय देण्यात येईल. या अतिक्रमण काढत असतांना दुसरीकडे जे लहान, मध्यम व्यावसायिक, हातगाडी, टपरी, हॉटेल्स, भाजीपाला, फळ विक्रेते ज्यांचे उपजिविका व कुटुंब या रोजगारीवर चालत होते, असे व्यावसायिकांचे दुकानं अतिक्रमणात निघाल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर आर्थिक व इतर संकट याप्रसंगी आलीत. चांगल्या कामात पण या अतिक्रमणधारक व पोटासाठी खळकी भरणारे सर्वसामान्य गोरगरीबांचे उपजिविकेला त्रास सहन करावा लागला हे पण तेवढेचं सत्य आहे. या बेरोजगरांबाबत लवकर आमदार किशोर पाटील त्यांच्याशी सखोल चर्चा करून योग्य मार्ग काढण्यासाठी सक्षम आहेत. शिवसेनेचे ८० टक्के समाजसेवा २० टक्के राजकारण हेच उद्दिष्ट प्रामाणिकपणे रात्र-दिवसं मनापासुन करत आहोत.
मा. किशोरआप्पांनी रूण्णांसाठी अॅम्बुलन्स,शेतकरीसांठी जेसीबी,सैनिकांच्या आई-वडीलांचा जाहिर सन्मान मेळावा, बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा घेवून २ हजारहुन अधिक युवकांना रोजगार उपल्बध करून दिले, मोफत मोतीबिंदू शिबीर, चश्मे व ऑपरेशन आणि सर्व खर्च करण्याचे तालुक्यात अजुनही सुरू आहे.
अफवांकडे दुर्लक्षाचे आवाहन
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पाचोरा व भडगाव तालुक्यात अनेक ठिकठिकाणी विविध विकास कामांची सुरूवात करण्यात आली आहे. आमदार किशोर पाटील यांना समाजसेवा सांगणार्यांनी स्वतःचे कारनामे व समाजसेवी कामांची यादी जनतेला जाहीर करावी ? आणि मगच या कनिष्ठ विचारवंतांनी आरोप करावे. शहरातील आणि तालुक्यातील सर्व व्यावसायिक व जनतेने उपोषण करणारे कनिष्ठ विचारवंताकडे व पोकळ अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि पाचोरा शहराच्या सर्वांगिन विकासासाठी अनमोल सहकार्य करावे असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख
किशोर बारवकर यांनी केले आहे.