नवापूर। तालुक्यातील चरणमाळ घाटात ट्रक अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली. डिझेल ट्रक एमएच 04-5277 चा अपघात होवून ट्रक दरीत कोसळला. माणिकराव गावीत पतसंस्थेचे मँनेजर जयवंत जाधव यांनी अपघाताचे अचुक ठिकाण व माहिती 108 हेड ऑफिसला दिली. माहिती मिळताच 108 रूग्वाहिकेवरील डॉ.सुनिल गावीत, लाजरस गावीत यांनी तातडीने लोकेशन घेत अपघात ठिकाणी जाऊन जखमी झालेल्या चालकाला उपचारासाठी नवापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेे. अपघात होताच बोरझर गावातील लोकांनी धावा घेतली. अपघातातील डिझल ट्रक रिलायन्स कंपनीचा असुन नवापूर येथे येत होता. टँकरमध्ये डिझेल असुन ते गळती होत आहे. यामुळे परिसरातील नागरीक भयभीत झाले असुन कंपनीचा लोकांना तातडीने बोलविण्यात आले आहे. लाखो रुपयाचे डिझेल अपघाता मुळे मातीमोल झाले असुन लिंकेच बंद करण्याचे शर्यतीचे प्रयत्न सुरु होते.
घाटातील नागमोडी वळण धोकेदायक
अपघात झाल्यावर डिझेलची लुटालुट झाल्याचे समजते, डिझेल टँकर घाटाचा खोलवर दरीत गेला आह.े बोरझर,चरणमाळ भागातील ग्रामस्थांनी दरीत उतरुन ड्रायव्हरला बाहेर काढले. टँकर दरीत कोसळुन ही नशीब बलवंतर होते म्हणुन ड्रायव्हर वाचला आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातामुळे टॅकर लिकेंज होऊन डिझेल दरीत थोड्या प्रमाणावर पडले आहे. यामुळे येथे मोठा अपघात होऊ शकतो. यासाठी या भागातील गाव पाड्यांवर राहणार्या ग्रामस्थांना धोक्याचा इशारा देण्यात आला असुन अग्नि प्रज्वलीत करु नका याबाबत सांगण्यात आले आहे. टॅकरचे स्पेअर पार्ट अस्ताव्यस्त झालेले आहेत. काही दिवसापुर्वी कलर घेऊन जाणार्या ट्रकचा अपघात याच ठिकाणी झाला होता. त्याच ठिकाणी हा अपघात होऊन टँकर दरीत कोसळला आहे घाटातील ते नागमोडी वळण हे डेन्जर स्पॉट ठरले आहे. या ठिकाणी स्टँरिंग मोठंया फरकाने न फिरल्यास वाहन दरीत कोसळुन अपघात होण्याचा अनेक घटना यापुर्वी घडल्या आहेत.