चरणमाळ घाटात पुन्हा अपघात

0

नवापूर । येथून जवळच असलेल्या चरणमाळ घाटात सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास धोकादायक वळणार ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पुन्हा एकदा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात चालकासह सहचालक गंभीर जखमी झाले. हा अपघात झाला त्यावेळी बोरझर गावातील लोकांना मोठ आवाज आल्याने परीसरातील नागरीकांनी अपघातच्या घटनास्थळी एकच धाव घेतली. या घटनेत ट्रक चालक दाबल्या गेल्याने गावातील संदेश गावीत यांच्यासह नागरीकांनी त्यांना बाहेर काढले. अपघाताबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात ट्रकचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नवापूर शहर परिसरात आतापर्यंत अनेक किरकोळ व गंभीर अपघात झाले. त्याठिकाणी 108 अ‍ॅम्बुलन्स ही अत्यावश्यक सेवा पोहचल्याने आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचले आहे. जखमी अथवा गंभीर रूग्णांना ऑक्सजनासह अत्यावश्यक आधुनिक सुविधा उपलब्ध होत असते, 108 चा कामाचे सर्व नागरिक नाव काढतात व समाधान व्यक्त होत आहे.

108 ची सेवा तत्पर ; नागरिकांची मदत
चरणमाळ घाटात ठिकठिकाणी मोठ वळणरस्ते असल्याने अनेक वेळा अपघाताच प्रमाण वाढ होत आहे. आज सकाळी 6.30 वाजता ट्रक क्रमांक (युपी 12 टी 3730) वरील चालक व सहचालक जात असतांना अचानक धोक्याच्या वळणावर ट्रकचा ताबा सुटल्याने अपघात झाला. सकाळी झालेल्या अपघातात चालक व सहचालक गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक पलटी झाल्याचा आवाज मोठ्या प्रमाणात होताच बोरझर गावातील लोकांनी धाव घेतली. परंतु चालक हे दाबल्या गेल्याने संदेश गावीत व गावातील लोकांनी दाबले गेलेले दोघे जखमींना बाहेर काढले तसेच लागलीच संदेश गावीत यांनी 108 रुग्वाहिकेला संपर्क साधला, अपघाताची माहिती मिळताच डॉ.सुनील गावीत, पायलट लाजरस गावीत यांनी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी झालेल्या ट्रक चालक व वाहक याना प्राथमिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे, त्यांचावर उपचार सुरू आहेत. अपघात ट्रक मधील जखमीना लवकर बाहेर काढून त्वरीत 108 अ‍ॅम्बुलन्स आल्याने चालक व वाहक यांच्या जीव वाचला आहे.

चरणमाळ घाट आणि वळणच वळण
रोज शेकडो वाहने चरणमाळ घाटातुन जातात जातांना येताना वळण अनेक वेळा घ्यावे लागते त्यामुळे अनेक ट्रक व मोठी वाहने बंद पडल्यानंतर अपघात होत असतात तसेच पाच ते सहा वेळा वाहन चालकांना वळण घेत पुढे चालावे लागते रोज प्रवास करणारा चालकाला काही वाटत नाही पण नवीन चालक आला की वळण घेता घेता अपघात घडतो.

योग्य ठिकाण व माहिती आवश्यक
काही वेळा अपघात होतो अपघात ठिकाणा हुन फोन येतो मात्र समोरचा व्यक्ती अपघात कुठे झाला आहे. याबाबत योग्य लोकेशन देत नाही, त्यामुळे 108 चूकीचा ठिकाणी जाते, तपास करता करता अखेर अपघात ठिकाणी येतांना उशीर होता. त्यामुळे योग्य वेळी उपचार व सेवा देत येत नाही व लोकांचा रोष ओढवून घ्यावा लागतो असे होऊ नये म्हणून शांत मनाने अपघात ठिकाण अचूक सांगावे जेणे करून तात्काळ पोहचता येईल.
– लाजरस गावीत, 108 पायलट, नवापूर