नांद्रा । पाचोरा येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री चरणांकीत तीर्थ स्थानाच्या श्री चक्रधर स्वामी मंदिराचा जिर्णौद्धार कळसारोहण उद्घाटन,भेटकाळपर्व,संन्यास दिक्षा अनुसरण विधी असा तिन दिवशीय कार्यक्रम संपन्न झाला. 22 रोजी जाधववाडीचे मोठे बाबा यांच्याहस्ते श्री चक्रधर स्वामी मंदीरावर ध्वजारोहण करून जामनेर रोडावरील अंबेवडगावच्या बाबांच्या आश्रमपासून कार्यक्रम स्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. 23 रोजी सकाळी कळशारोहन होऊन दुपारी प्रवचन महाप्रसाद व संध्याकाळी सहा वाजता देशमुख वाडी ते श्रीकृष्ण मंदीरापर्यत शोभायात्रा काढून श्रीकृष्ण मुर्तीस्थापना करण्यात आली. 24 रोजी प.पु.प.म.दुतोंडे बाबांनी निरुपण झाले.
कनाशी येथील न्हाणनी च्या व पाचोरा येथील श्री चक्रधर स्वामी मंदीराचा जिर्णौद्धार मानेकर बाबांनी केला म्हणून आंबेवडगाव निवाशी यळमकर बाबांनी मानेकर बाबांना प्रस्थीपत्र देऊन सन्मान केला. भेटकाळपर्व, संन्यास दिक्षा, अनुसरण विधा असा कार्यक्रमास महानुभाव पंथातील जेष्ठ श्रेष्ठ महंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुरलीधर महानुभाव अर्थात मानेकर बाबा श्री क्षेत्र कनाशी यांनी केले होते. या कार्यक्रमास प.पु.प.म.श्री येळमकर बाबा आंबेवडगाव, प.पु.प.म.वैराग्यमुर्ती श्री मोठे बाबा जाधववाडी, प.पु.प.म.दुतोंडे बाबा महानुभाव कुसंदा, प.प.प.म.वर्धनस्थ बीडकर बाबा महानुभाव रणाईचे,प.पु.प.म.श्री मोठे बाबा खामनीकर जाळीचादेव,प.पु.प.म.महर्शी विद्याधर दादा पंजाबी टाकळी यांच्या सह महानुभाव पंथातील जेष्ठ श्रेष्ठ महंत उपस्थित होते.