इंदापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाने राज्य स्तरीय ’ ज्ञानाच्या कालखंडात शैक्षणिक ग्रंथालयाचे सक्षमीकरण’ या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते.
कार्यशाळेचे उदघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉ. पानगे यांच्या हस्ते करण्यात आले.महाराष्ट्रातील 59 ग्रंथपालांनी चर्चासत्रात सहभाग घेवून आपले शोध निबंध सादर केले. ग्रंथालयाचे मानवी जिवनातील स्थान अनन्य साधारण असल्याचे मत डॉ. पानगे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे ग्रंथालय आधुनिक काळाशी सुसंगत होण्यासाठी संगणीकरणातून डिजिटल ग्रंथालयाकडे वाटचाल करत असल्याची माहिती प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांनी दिली. यावेळी इंदापूर तालुका शिक्षक प्रसारक मंडळाचे संचालक अॅड. अशोक कोठारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. मनिषा गायकवाड यांनी केले. प्रा.मृदुल कांबळे, प्रा.गौतम यादव व सहकारी कर्मचारी यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला.