चर्चेत नसणार्‍यांना काँग्रेसने दिली उमेदवारी

0

नवापूर । नगर पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षातील तिकीट वाटपाचा घोळ काल दुपार पर्यत कायम राहुन अखेर मिटला असून ओढताण दुपारपर्यंत सुरु होती. कोणता उमेदवार कुठे फिक्स हे कोणीच ठामपणे सांगत नव्हते. काँग्रेस श्रेष्ठीकडे बोलावण होत तसे उमेदवार ये जा करत होतेे. जो तो काय झाल कोण फिक्स..चर्चा सुरु आहे..हा फिक्स..नाही हा कँसल.काँलेजला मिटींग सुरु आहे हेच सुरु होते. प्रभाग 2साठी बंन्टी चंदलानीसाठी समर्थकांनी शेवटपर्यत प्रयत्न करुन अखेर यश मिळवले असून तिकिट मिळविले आहे. प्रभाग 2,5,3 व इतर प्रभागांसाठी नाव फिक्स मिनटा मिनटाला बदलत होते. एवढी खेचोखेच व नाव जाहीर करण्यासाठी लागलेला विलंब यापुर्वी काँग्रेस पक्षात कधी ही पहायला मिळाला नाही.

ढोल ताश्यांसह भव्य रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन
दुपारी काँग्रेस,राष्ट्रवादी व अन्य पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेस उमेदवार गिरिष गावीत,विश्‍वास गढरी,राष्ट्रवादीचे नरेंद्र नगराळे,नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. अर्चना नगराळे (वळवी)यांनी ढोल ताशांनी प्रचंड संख्येचा रॅलीत येऊन तहसील कार्यालयात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप सेना युतीसाठी अखेरपर्यत प्रयत्न सुरु होते. एक दोन जागे साठी घोड अडल आहे असे बोलले जात होते. भाजप पक्षाचे ही उमेदवार फिक्स करण्यासाठी ओढताण झाली. प्रभाग 2मध्ये कोणाला उमेदवारी द्यावी याची माथाकुट झाल्याचे समजते. जिल्हाध्यक्षांकडून कोणत्या उमेदवाराला ए बी फार्म दिला जातो यानंतर च कोणता उमेदवार कोणत्या प्रभागात हे चित्र स्पष्ट होणार आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. ढोल ताशे वाजवत गुरुवारचा शुभ मुहुर्त साधत उमेदवार अर्ज दाखल करत होते. गर्दी पाहुन निवडणुक आहे असे वाटायला लागले आहे. ज्यांना तिकिट मिळाले नाही ते राष्ट्रवादी व भाजपकडे वळले असून त्यापक्षाकडुन उमेदवारी दाखल केली आहे. आओ जाओ सत्र सुरु झाले असून काहींना पुर्वी हा सांगितल्याने त्यांनी बँनर व सोशियल मिडीयावर पोष्ट टाकुन प्रचार सुरु केला होता. त्यांना अखेर काल नाही सांगितल्यांवर त्यांचात प्रचंड नाराजी व हिरमोड झाल्याचे दिसले व काही चर्चत ही नसल्यांना फोन करुन कागद पत्र मागुन फार्म भरायला लावले आहेत.