मुंबई । रेल्वेत चर्तुथ श्रेणीचा कर्मचारी म्हणून कर्ण शर्मा 2005 ला भरती झाला.ज्या श्रेणीत तो भरती झाला होता.त्याश्रेणी मोठ्याप्रमाणात श्रम करावे लागत असे, तो रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखरेखचे काम करत होता.लोखंडी रॉड उचलण्यापासून ते रुळांची दुरुस्ती करण्यापर्यंत सर्वच अंग मेहनतीचे काम त्याने केले आहेत. वेळोवेळी क्रिकेट खेळण्यासाठी त्याला या कामांपासून सुटका मिळाली होती. क्रिकेट जगात तो स्टार बनणार असे कोणाला कधी काळी वाटलेपण नसेल,मात्र क्रिकेट खेळण्यासाठी मिळणारी वेळोवेळी सुट या संधीचा त्याने फायदा करून घेतला. तो वाराणसी येथे कार्यरत होता. प्रथम तो चर्चेत आला तो दलीप ट्रॉफीत एकाच मॅचमध्ये 10 विकेट्स घेऊन .त्याने पहिल्या इनिंगमध्ये 39 रन देऊन त्याने 4 विकेट्स पटकावल्या. तर, दुसर्या इनिंगमध्ये 94 रन देऊन त्याने 6 बळी घेतले.आयपीएलच्या 7 व्या सीजनमध्ये तो एका दिवसात करोडपती झाला होता. सनरायजर्स हैदराबादने त्याला 3.75 कोटी रुपये देऊन टीममध्ये सामिल केले होते.
पत्नीला विश्वास बसेना
कर्णला आपण कोट्यधीश झालेला क्षण आजही आठवतो.आपल्याला आयपीएलमध्ये कोट्यवाधीशमध्ये खरेदी केले आहे.यावर पहिल्यांदा तर त्यालाच विश्वासच बसला नाही. त्याने आपल्या पत्नीला फोन करून 3.75 करोड रूपये मिळणार अशी गोड वार्ता सांगितली. मात्र पत्नीचा यावर गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. कर्ण मस्करी करत असेल असे तिला वाटले होते. तिने कर्णच्या मित्रांना फोन करून खरे काय ते जाणून घेतले होते.
असा होता ऐतिहासिक सामना
स्टार बॅट्समन करुण नायर (120) ची सेंचुरी सुद्धा इंडिया ग्रीनला वाचवू शकली नाही. विरोधक टीम इंडिया रेडने 170 धावांनी मोठा विजय नोंदवला. इंडिया रेडने पहिल्या इनिंगमध्ये 323 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तर देण्यासाठी उतरलेली टीम इंडिया ग्रीन 157 धावांवर गुंडाळली गेली. पहिल्या इनिंगमध्ये इंडिया रेडला 166 धावांची लीड मिळाली होती. इंडिया रेडने दुसर्या इनिंगमध्ये दो विकेट गमवून 307 धावा केल्याचे जाहीर केले. आणि इंडिया ग्रीनसमोर 474 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. यात टीम इंडिया ग्रीन 303 धावांवर सर्वबाद झाली.