कनाशी, टोकडे येथे चर्मकार उठाव संघाची पायाभरणी
चाळीसगाव – कळवण तालुक्यातील कनाशी गावात चर्मकार उठाव संघाने आपला पाया रोवला असुन आज उठाव संघाचे प्रदेश अध्यक्ष मोतीलाल अहिरे यांनी समाज बांधवांना बैठकीत मोलाचं मार्गदर्शन केलं यावेळी प्रदेश संघटक शिवाजी गांगुर्डे, अनिल जाधव, महिला राज्य उपाध्यक्ष कल्पनाताई बोरसे,आंनद गांगुर्डे खुशाल मोरे अशोक गांगुर्डे, कैलास अहिरे यांची उपस्थिती होती.
यावेळी इतर संघटनाकडून समाजाचा अपेक्षा भंग झाला असून स्वार्था साधण्या पलीकडे नेत्यांनी काही केले नाही. म्हणून व्यक्ती विकास केंद्रित समाजविकासाला दिशा देण्याचं व्हिजन घेवून चर्मकार उठाव संघ ही चळवळ उभी राहिली आहे. उठाव संघाच्या या लोक चळवळीत लोक मोठ्या प्रमाणावरसहभागी होत असल्याची माहिती मोतीलाल अहिरे यांनी दिली. उठाव संघाच्या कार्याने प्रभावित होऊन त्यात सहभागी होण्याची घोषणा यावेळी समाजबांधव सुनील राजभोग, प्रकाश राजभोग, राकेश राजभोग, रोशन राजभोग, अमित राजभोग, राकेश राजभोग, कुणाल राजभोग, प्रशांत गोविंद, धनंजय राजभोग यांनी केली. यावेळी समाजाच्या महिला सरपंचा जिजाबाई गोविंद यांचा सत्कार चर्मकार उठाव संघाच्या वतीने करण्यात आला.