चाळीगसगाव । तालुक्यातील डोण येथील विवाहिता कविता खंडू वाघ यांनी गावातील राजू बापु व आई यांच्या जाचाला कंटाळून जाळून घेवून आत्महत्या केली. जळीत महिला कविताने मृत्युपूर्व जबाबानुसार तिघांवर गुन्हा दाखल करणेऐवजी पोलिसांनी दोघांवरच गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी ज्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला त्यांना अटक केलेली नसून पोलीसांची तपास अधिकारी यांची देखील चौकशी करावी तर दुसर्या घटनेती बीडीओ मधुकर वाघ यांनी राजकीय जाचाला कंटाळून विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची आहे. याकामी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरेापी संजय निकम यांचे विरुद्ध बीडीओ यांनी मधुकर वाघ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेवून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तीककुमार पांडे यांनी निकम यांना निलंबित करुन त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले होत. त्याचा राग मनात धरुन त्यांनी उपसभापती संजय पाटील, सभापती स्मितल बोरसे त्यांचे पती दिनेश बारसे यांचेसह कार्यालयीन कर्मचारी व भाजपाच्या अन्य पं.स.सदस्यांना हाताशी धरुन त्यांचा आतोनात छळ केला. दोषींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही, अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
चर्मकार समाजाच्या या आहेत मागण्या
आरोपींना त्वरीत अटक करण्यात यावी, गुन्हा दाखल झालेल्या सर्व कर्मचार्याना निलंबित करावे, त्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी, मनरेगाच्या प्रशासकीय वाटप प्रक्रिया सदोष नसल्याने सर्व प्रशसासकीय मान्यता त्वरीत रद्द करण्यात याव्यात, रोजगार हमी योजनेच्या सन 2011 पासून ते 2017 पर्यत झालेल्या कामांची चौकशी व्हावी, डॉ.अरविंद मोरे यांची निघृण हत्या झाली या प्रकरणाचा तपास त्वरीत पूर्ण व्हावा, सहराणपूर उत्तर प्रदेश येथील चर्मकार समाजाचा युवक अॅड. चंद्रशेखर आझाद रावण यास सुप्रिम कोर्टाने जामीन मंजूर केल असून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला आहे. तरी सदरचा कायदा हटवून त्यांची सुटका करण्यात यावी.
यांची होती उपस्थिती
विश्वास रामभाऊ मारे, प्रताप मोतीलाल पवार, प्रविण भिकन वाघ, गोपाल मोरे, अल्ताफ नदीर पिंजारी, अजय देसाई, संदीप प्रभाकर गोडकर, सोपान विश्वनाथ बोरटी, किशोर संतोष महाले, विष्णू घोडके, योगेश कडवे, रघुनाथ सोमा वाघ, जामा दगा वाघ, सिताराम उखा महाले, संदिप जयराम अहिरे, साहेबराव वाल्मिक अहिरे, रोहिदास खंडू सोनवणे, गोकुळ मन्साराम अहिरे, राहुल राजाराम अहिरे, योगेश भाऊसाहेब कडवे, विष्णू घोडके, बाळासाहेब गायकवाड, गंगाराम तेली, दिनेश देवरे, गौतम सातपुते, युवका प्रदेशाध्यक्ष, ज्योती निभोरे, कमल धामुणे, शोभा तायडे, सरला किशारे वानखेडे, वंदना कळसकर आदीं उपस्थित होते.