चर्मकार समाज अधिवेशनाच्या अध्यक्षपदी मोतीलाल अहिरे

0

चाळीसगाव । चर्मकार समाजाचे दुसरे महाअधिवेशन औरंगाबादला होणार असून अधिवेशनाच्या अध्यक्षपदी मोतीलाल अहिरे, तर स्वागताअध्यक्ष म्हणून बाळासाहेब गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. चर्मकार समाजाचं महाअधिवेशन 7 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं असून चर्मकार उठाव संघाचे संस्थापक अध्यक्ष अशोकजी कानडे, सचिव विजयजी घासे यांनी राज्य सरचिटणीस मोतीलाल अहीरे यांची महा अधिवेशनाच्या अध्यक्षपदी निवड केली तर स्वागताध्यक्ष म्हणून प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब गायकवाड (औरंगाबाद ) कार्यादयक्ष म्हणून सुभाषजी बडोदे समाजनेते (औरंगाबाद) यांची निवड करण्यात आली आहे.