वडमुखवाडी, चोविसावाडी येथे कारवाई झाली
चर्होली : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने वडमुखवाडी, चोविसावाडी येथे चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविला. यामध्ये तीन पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली.
पालिकेची धडक कारवाई
‘इ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्रमांक तीनमधील वडमुखवाडी, चोविसावाडी येथे अनधिकृत बांधकामे सुरु होती. या बांधकामावर पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने धडक कारवाई केली. यामध्ये वडमुखवाडी येथील स.नं. 172/1, 164 कानिफनाथ चौक जवळ वडमुखवाडी रस्त्यालगत एक मोठे पत्राशेड अंदाजे 4368.00 चौरस फूट प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. तसेच दोन पत्राशेड अंदाजे क्षेत्रफळ 7041.02 चौरस फूट या शेडचे पत्रे मालकाने स्वत:हून काढून घेतले. संपूर्ण दोन्ही शेड काढण्याचे हमीपत्र लिहून दिले. असे एकूण तीन चालू अनधिकृत (पत्रा शेड, गोडाऊन – तीन) क्षेत्रफळ अंदाजे 11409.58 चौरस फूट पाडण्यात आले.