पिंपरी ः भरधाव वाहनाच्या धडकेने पादचार्याचा मृत्यू झाला. दाभाडे वस्ती, चर्होली बुद्रुक येथे बुधवारी (दि. 22) सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रताप नागनाथ झोंबाडे (वय 40) असे या अपघातातमृत्यू झालेल्या पादचार्याचे नाव आहे. तर गणेश सीताराम घायतिडके (वय 30, रा. ओझर, ता. जुन्नर) असे आरोपी वाहनचालकाचे नाव आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गणेश दशरथ कळंके यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हे देखील वाचा