‘चला हवा येऊ द्या’मध्ये आला ‘सिंबा’!

0

मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ या भन्नाट विनोदी कार्यक्रमात मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार येत असतात. आता या कार्यक्रमात ‘सिंबा’ची टीमदेखील हजेरी लावणार आहे.

‘सिंबा’ चित्रपटाच्या प्रमेशनसाठी संपूर्ण टीम या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. झी मराठीने आपल्या फेसबुक पेजवरून याबाबतची माहिती दिली आहे. यासोबतच रणवीरच्या डान्सचे खास व्हिडिओदेखील शेअर केले आहेत. हा चित्रपट येत्या २८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.