‘चले जाव’च्या अमृत महोत्सवासाठी कार्यक्रम

0

शहादा। 1942 च्या चले जाव चळवळीचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने राष्ट् सेवा दल या एतिहासिक घटनेचे कृतज्ञतापुर्वक स्मरण करण्यासाठी राजव्यापी जागरयात्रा आयोजित केली आहे. 1942च्या ऑगस्ट क्रांती पर्वाला 75 वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने स्वातंत्र्य चळवळीत हुतात्मा पत्करणार्‍या खर्‍या विरांना अभिवादन, शाळा कॉलेजात इतिहासीक लढयाचे दर्शन, पाणी पर्यावरण शेतकरी शेतमजूर साक्षरता, स्वयरोजगार, लोकसहभागातून ग्रामसुराज्य संकल्पना साकार करण्यासाठी कृती कार्यक्रम सद्यस्थितीत राष्ट्र सेवादल सारख्या धर्मनिरपेक्ष समाजवादी राष्ट्रीय अराजकीय संघटनेचे महत्व आदी विषयावर प्रभोधन कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजीत करण्यात येणार आहेत.

असे राहणार कार्यक्रमांचे नियोजन
त्यासाठी ऑगस्ट क्रांती जागर यात्रा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. ज्यात 31 जुलै रोजी सकाळी 7 वाजता तळोदा मोरवड येथुन 11 वाजेला रावळा पाणी येथे भेट व अभिवादन करुन सध्याकाळी 5 वाजता तळोदा येथे मुक्काम 1 ऑगस्ट सकाळी 9 वाजता नंदुरबार येथे हुतात्मा शिरीष कुमार स्मारक येथे अभिवादन, नंतर नाईक महाविद्यालय शहादा व लोणखेडा महाविद्यालयात अभिवादन सभा, चिमठाणे येथे दुपारी 3 वाजता हुतात्मास्मारक अभिवादन, नंतर साक्री येथे मुक्काम 9 ऑगस्ट क्रांती मैदान मुंबई येथे समापन होणार आहे, अशी माहिती राष्ट्रसेवादलाचे कार्याध्यक्ष ईश्वर चौधरी यांनी पत्रकाद्वारे
कळविले आहे.