परशुराम वाडेकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार
इंदापूर : चळवळीचे बाळकडू हे विद्यार्थी दशेतच मिळाल्याने भय नावाची गोष्ट माझ्या शब्दकोषातच आढळली नाही. जिवाची पर्वा न करता चळवळीत उतरलो. दलित पँथर, भारतीय दलित पँथरमध्ये काम केल्याने पुढील चळवळीचा मार्ग सुकर झाला. त्याकाळी चहाचे पैसे देण्यासाठी नव्हते; पण आज हॉटेल मालक झालो हे आवर्जून सांगताना चळवळीचे बाळकडू हे विद्यार्थी दशेतच मिळाल्याने भय नावाची गोष्ट माझ्या शब्दकोषातच राहिली नसल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सोमवारी (दि. 14) शाहु-फुले-आंबेडकर वसतिगृहामध्ये वाडेकर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. अरविंद वाघ, उमेश कांबळे, शिवाजीराव मखरे, प्रवीण ओव्हाळ संदिपान कडवळे, अशोक मखरे, सुधाकर बोराटे, देवा राखुंडे, सुधीर मखरे, रमेश शिंदे, दिलीप शिंदे, चाँद पठाण, मुन्ना बागवान, दत्ता पवार उपस्थित होते.
आमच्याकडे पैसे नसायचे…
वाडेकर म्हणाले, त्यावेळी डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी आमच्याकडे पैसे नसायचे. रस्त्याच्या कडेला फाटकी तुटकी पोती वेडीवाकडी काठीला बांधून निवारा करायचा आणि त्यामध्ये बाबासाहेबांचा फोटो ठेवून मेणबत्ती लावायची व अभिवादन करायचे. हल्ली जगामध्ये बाबासाहेबांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होत असून मिरवणूका काढून जल्लोशात आंबेडकर जयंती साजरी होते. ही आमच्यासारख्या चळवळीत काम केलेल्या कार्यकर्त्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. यावेळी अमोल मिसाळ, महेश सरवदे, प्रवीण मखरे, नितीन झेंडे, भाऊसाहेब कांबळे, सागर सोनवणे, सुनील सोनवणे उपस्थित होते. सूत्रसंचलन गफूर भाई सय्यद यांनी केले, तर आभार राकेश कांबळे यांनी मानले.