चव्हाण महाविद्यालयात मोबाईल नेटवर्क जॅमर बसवा

0

चाळीसगाव येथे रयतसेनेची मागणी

चाळीसगाव – चव्हाण महाविद्यालयात कॉलेजच्या वेळेत विद्यार्थी मोबाईल वर महाविद्यालयीन आवारात ऑनलाईन राहत असुन त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परीणाम होत असुन चव्हाण महाविद्यालयात मोबाईल नेटवर्क जॅमर बसविण्यात यावे, अशी मागणी २० डिसेंबर रोजी रयत सेनेच्या वतीने राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अरुण निकम व व्हा.चेअरमन डॉ. संजय देशमुख यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश समन्वयक पी.एन.पाटील, प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, तालुका उपाध्यक्ष समाधान मांडोळे, मुकुंद पवार, दत्ता पवार, रोहन पाटील, किरण पाटील, रणजीत पाटील, पवन निकुंभ, शिवाजी काळे, खुशाल पाटील, पप्पु पाटील. राहुल पाटील, सुयोग पाटील, मंगेश महाजन, अनुप देशमुख आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.