मंचर । आंबेगाव वसाहत येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलींसाठी दोन दिवसीय स्मार्ट गर्ल सबलीकरण कार्यशाळा घेण्यात आला. याला विद्यार्थीनींचा चांगला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती मुख्याध्यापक अविनाश ठाकुर यांनी दिली. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील संस्थापक असलेल्या आंबेगाव वसाहत येथील विद्यालयातील विद्यार्थिनींना योग्य वयात स्वसंरक्षण प्रशिक्षण मिळणे आवश्यक असून त्यासाठी स्मार्ट गर्ल प्रशिक्षण उपयुक्त आहे.
यावेळी विद्यार्थिनींना आत्मजाणीव, संवाद व नातेसबंध व स्वसंरक्षण निवड व निर्णय मैत्री व मोह मुलींच्या किशोरावस्था तसेच पौंगडावस्थेतील शारीरिक व मानसिक भावनिक बदल या अशा अनेक विषयांवर पीपीटी, खेळ, नाटिका, कृतियुक्त चर्चा या माध्यमातून उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेस विद्यालयातील स्त्री पालकही उपस्थित होते. तसेच शाश्वत संस्थेच्या पालकही उपस्थित होते. या कार्यशाळेस विद्यालयातील शिक्षिका मनिषा आढळराव, वंदना मंडलिक, लक्ष्मी वाघ, कविता ढेरंगे या शिक्षिकांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेस विद्यालयातील शिक्षिका वैशाली काळे यांनी मार्गदर्शन केले.