चहार्डी येथील एकाची दोन लाख 60 हजारांत फसवणूक

0

चोपडा : शेत गट नंबर दुसर्‍याच्या नावावर असताना भिमान गृप रियल इस्टेट अँड डेव्हलपर्स या फर्म चालकांनी चहार्डीच्या एकास 2 लाख 60 हजाराची फसवणूक केली आहे. या बाबत भिमान गृपच्या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोपडा येथे भिमान गृप रियल इस्टेट डेव्हलपर्स ही फर्म चालवून कट कारस्थान रचून चहार्डी येथील धनराज वसंत बडगे यांचा विश्वास संपादन करून चोपडा शिवारातील बिन शेती गट नं 1035 ही त्यांचे नावावर नसतांना देखील ती आमचे नावावर आहे असे सांगून त्यात फिर्यादिस बळखळ प्लॉट नं 57 बाबत स्टॅम पेपरवर अँग्रीमेंट टाइप केला.

पैसे परत मागितल्यावर उडवा उडवीची उत्तरे
सदरचा प्लॉट 18 लाख 97 हजार 460 चा विक्री करण्याचे ठरवून त्यापोटी वेळोवेळी बँक खात्यावर पैसे जमा केले. सदर प्लॉट हा भिमान गृपच्या नावावर नसून तो नीता सुधाकर पाटील यांच्या मालकीचा आहे असल्याचे समजल्याने सदर दिलेले पैसे फर्मकडून मागितले असता उडवा उडवीची उत्तरे देत फसवणूक केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून धनराज वसंत बडगे (वय 36 रा. चहार्डी ता. चोपडा) यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला सतीश सोमा वाडे, जितेंद्र सोमा वाडे, विशाल अर्जुन संदनशिव (रा. तारामती नगर चोपडा) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे हे करीत आहेत.