‘चहाविक्रेता ते अटल बिहारी वाजपेयी’, अशी मिळाली भूमिका

0

मुंबई : ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ बऱयाच दिवसापासून चर्चेत आहे. या चित्रपटातील स्टारकास्ट मिळविण्यासाठी दिग्दर्शकाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेसाठी देखील अशीच मेहनत घ्यावी लागली होती.

अटल बिहारी वाजपेयीच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक विजय गुट्टे यांनी तब्बल ५० पेक्षा जास्त कलाकारांची स्क्रिनटेस्ट घेतली होती. चित्रपटाच्या चित्रीकरणाला तीन दिवस बाकी असताना चित्रपटाच्या टीमला एक चेहरा मिळाला. खूप कमी वेळात राम अवतार भारद्वाज या चहाविक्रेत्याला या भूमिकेसाठी तयार करण्याचा निर्णय घेतला.